यष्टीमधील मायक्रोफोन चिंतेचा विषय – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन

मेलबर्न: यष्टीमधील मायक्रोफोनद्वारे सर्वांना ऐकू येणारे क्रिकेटपटूंचे संभाषण हा आता चिंतेचा विषय बनत चालला आहे, असे म्हणत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने या मायक्रोफोनसंदर्भात चिंता प्रकट केली आहे. या मायक्रोफोनद्वारे जे संभाषण ऐकू येते त्यामुळे खेळाडूंवर निष्कारण निर्बंध घातले जाऊ शकतात. त्यामुळे या मायक्रोफोनच्या वापरा बाबत नियम स्पष्ट व्हायला हवेत, असे संघटनेचे म्हणणे आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष निकोलसन यांनी म्हटले आहे की, आम्ही नाराज आहोत असे नाही पण कुणी खेळाडू अपघाताने एखादी गोष्ट बोलतो आणि ती मायक्रोफोनमधून ऐकू येते. यातून खेळाडूवर आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल कारवाई केली जाऊ शकते. हे आम्हाला नको आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यष्टीमधील या मायक्रोफोनमुळे ऑस्ट्रेलियाच्या आणि भारताच्याही खेळाडूंची संभाषणे जगभर ऐकू गेली आहेत आणि त्यावरून बरीच चर्चाही होऊ लागली आहे. टिम पेन आणि फिंच यांच्यात रोहित शर्माबद्दल झालेले संभाषण असो वा पेनने ऋषभ पंत बद्दल केलेले विधान असो या ताजा घटना आहेत ज्याबद्दल बरीच चर्चा झालेली आहे. त्याआधी, इशांत शर्मा आणि रवींद्र जाडेजा यांच्यात झालेला वादही या मायक्रोफोनमुळे स्पष्ट झाला होता. विराट आणि टिम पेन यांच्यातील धारदार संवादही रंगले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)