यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हवी

पोलीस अधीक्षक संदीप पाटील

सणसवाडी- विद्यार्थ्यांकडे जीवनात यश मिळवण्यासाठी चौफेर वृत्ती असावी. जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा अंगीकारून यश साध्य होत असते, असे मत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेश्‍वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे होते. पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, साहित्य, गायन, संगीत आदी विविध क्षेत्रात सहभाग घेतला पाहिजे. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना पाटील यांनी उत्तर दिले. यावेळी बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पखाले, दौंडचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे, पोलीस निरीक्षक शेलार, पंचायत समिती माजी उपसभापती मोनीका हरगुडे, बाजार समिती संचालक दत्ताभाऊ हरगुडे, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस पंडित दरेकर, कॉंग्रेस तालुका अध्यक्ष वैभव यादव, रांजणगाव गणपती ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर, मुख्याध्यापक बी. डी. गोरे, शिक्षक, संचालक मंडळ, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत विजयराज दरेकर यांनी केले. प्रास्ताविक रंगनाथ हरगुडे यांनी केले. सूत्रसंचालन रणसिंग सर यांनी केले. माजी उपसभापती मोनिका हरगुडे यांनी आभार मानले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)