यशोमती ठाकूर यांची काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती

नवी दिल्ली – राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर काँगेसची  संपूर्ण टीम बदलण्यात येत असून, अनेक युवा चेहऱ्यांना ‘टीम राहुल’मध्ये संधी दिली जात आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीममध्ये आता  महाराष्ट्रातील आमदार यशोमती ठाकूर यांचाही समावेश झाला आहे. यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच, कर्नाटकचे प्रभारी आणि महासचिव के. सी. वेणूगोपाल यांच्यासोबत सहप्रभारी म्हणूनही ठाकूर काम पाहणार आहेत.यशोमती ठाकूर या अमरावतीतील तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार आहेत. पेशाने वकील असणाऱ्या यशोमती ठाकूर. काँग्रेसच्या विविध आंदोलनांमध्ये त्या अग्रभागी असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)