सातत्यपूर्ण यशासाठी अधिक मेहनत घ्या

अजित पवार : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जिंकणाजया राज्य संघाच्या खेळाडूंचा गौरव

पुणे : पुरूष कबड्डी संघाने 11 वर्षांनंतर महाराष्ट्राला राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्‍यपद मिळवून दिले आहे. या संघातील खेळाडूंचे, त्यांच्या प्रशिक्षकांचे, व्यवस्थापकांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. हे यश यापुढील काळातही कायम राखण्यासाठी खेळाडूंनी आणि संघटनेतील पदाधिकाजयांनी अधिक मेहनत घ्यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे माजी अध्यक्ष, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले.

हैदराबाद येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरूष गटामध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपदाला गवसणी घातली. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेतर्फे विजेत्या संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना तसेच आशियाई कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनाही या वेळी प्रत्येकी 51 हजार रूपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये झालेल्या या गौरव सोहळ्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील, सचिव अॅड. आस्वाद पाटील, कार्याध्यक्ष दत्ता पाथ्रीकर, खजिनदार शांताराम जाधव, उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर यांच्यासह आजी-माजी कबड्डीपटू तसेच अनेक जिल्हा संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-

या वेळी आपले विचार मांडताना अजित पवार म्हणाले,राज्याच्या क्रीडा क्षेत्राचा विचार करता नव्या वर्ऱ्षाचा प्रारंभ जोरात झाला. तब्बल 11 वर्षांनंतर आपल्या कबड्डीपटूंनी विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. पुरूषांच्या संघाने मिळवलेले हे यश राज्यातील कबड्डीला नवी उर्जा देणारे आहे. यश मिळविण्यापेक्षा ते टिकविणे अवघड असते. या यशामध्ये सातत्य राखण्यासाठी मेहनतीबरोबरच पारदर्शकता आवश्‍यक आहे. खेळाडूंबरोबरच पदाधिकाजयांनीही यादृष्टीने गंभीरपणे प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. कबड्डी लीगमुळे खेळाडूंना लोकप्रियता तसेच आर्थिक संपन्नता लाभली आहे. ही आनंदाची गोष्ट असली तरी कबड्डी या खेळाचा मूळ गाभा आणि खेळाडूंचे आरोग्य याला धक्का लागता कामा नये, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे. खेळाडू स्टेरॉईड्‌सपासून दूर राहतील, यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवे.

बुवा साळवी यांनी कबड्डीच्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात केले. नंतर शरद पवार यांनी कबड्डीला प्रतिष्ठा मिळवून दिली. अनेकांच्यास मेहनतीमुळे ही खेळ देशाच्या कानाकोपजयात तसेच सातासमुद्रापार गेला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राला राष्ट्रीय विजेतेपद हुलकावणी देत होते. अखेर 11 वर्षांनंतर पुरूष संघाने महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले आहे. आता महिलांनीही राष्ट्रीय विजेतेपद खेचून आणावे, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)