शिक्रापूर- विद्यार्थ्यांनी आयुष्यात मोठी स्वप्ने पाहवीत जीवनात अशक्य, असे काहीच नाही. फक्त यश आणि मान सन्मानासाठी चुकीचा शॉर्टकट नको. अभ्यासातील सातत्य व वेळेचे नियोजन ही यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती पारितोषिक विजेते पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे केले आहे.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील संभाजीराजे विद्या संकुल येथे श्री संभाजीराजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या कला, वाणिज्य, विज्ञान विभागातील बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्था सचिव प्रकाश पवार, आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, यशास्विनी अभियानच्या समन्वयक दिपालीताई शेळके, संस्था संचालक साहेबराव उमाप, सुरेश मोरे, प्राचार्य रामदास थिटे, कुलसचिव गजानन पाठक यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. पवार म्हणाले की, शिरूर तालुक्याने स्पर्धा परीक्षेव्दारे अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रशासकीय अधिकारी दिले, ही गौरवास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी. बारावी परिक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती चळवळ व्यापक व्हावी यादृष्टीने विद्यालयास 75 हजार रुपये किमतीची 10 ग्रंथालयीन कपाटे विद्यालयास भेट दिली. याप्रसंगी आंबेगाव बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, यशास्विनी अभियानच्या समन्वयक दिपाली शेळके यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश बांगर यांनी केले. प्राचार्य रामदास थिटे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. संतोष डफळ यांनी आभार मानले.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा