“यशवंत सातारा कुस्ती संघ’ करणार पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन

सातारा- ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या दिवंगत खाशाबा जाधव यांचे नाव क्रीडा क्षेत्रात अग्रस्थानी आहे. याच ऑलिम्पिकविराला अभिवादन करण्यासाठी “झी महाराष्ट्र कुस्ती दंगल’मध्ये सहभागी होणारा “यशवंत सातारा कुस्ती संघ’ सोमवारी, दि. 29 रोजी कराड तालुक्‍यातील गोळेश्वरला येणार आहे. झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये सहभागी होणारा हा संघ कुस्तीपट्टू खाशाबा जाधवांची प्रेरणा घेऊनच राज्यात जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. यशवंत सातारा संघाचे मनोबल वाढविण्यासाठी जास्तीत जास्त कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे आयोजक पुरूषोत्तम जाधव यांनी केले आहे.

झी महाराष्ट्र कुस्ती दंगल दि. 2 ते 18 नोव्हेंबर रोजी कालावधीत दररोज सायं. 6 ते 9.30 वा. झी टॉकीजवर होत आहे. या स्पर्धेमध्ये आपल्या जिह्याची “यशवंत सातारा संघ’ सहभागी होणार आहे. या स्पर्धेचे अभियान सोमवारी, दि. 29 सकाळी 10 वा. स्वराज्याची राजधानी सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरुवात करत आहोत. यानंतर सकाळी 11 वाजता स्वतंत्र भारत देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र कुस्तीपट्टू स्व. पै. खाशाबा जाधव यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या गावी गोळेश्वर (ता. कराड) येथे जाणार आहोत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यानंतर दुपारी 12 वाजता महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी प्रीतिसंगमावर अभिवादन व दु. 1 वाजता आटके (ता. कराड) येथे महाराष्ट्र केसरी स्व. पै. संजय पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करणार आहोत. यशवंत सातारा संघाचे सर्व सहभागी खेळाडू तसेच सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समस्त सातरकरांनी आपल्या सातारा जिल्ह्याच्या “यशवंत सातारा’ संघाचे मनोबल उंचावण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संघाचे आयोजक पुरुषोत्तम जाधव यांच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)