यशवंत, शत्रुघ्न सिन्हा यांना “आप’ची ऑफर

नोएडा: भाजप सरकारवर सातत्याने टिका करणारे भाजपमधील दिग्गज नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा या दोन नेत्यांना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोठी ऑफर दिली आहे. यशवं सिन्हा यांना लोकसभा निवडणूक लढवावी, अशी विनंती केजरीवाल यांनी केली आहे.

आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित “जन अधिकार’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांच्यासह भाजप नेते यशवंत सिन्हा आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची उपस्थिती होती. यावेळी सभेला संबोधित करत असताना केजरीवाल म्हणाले, काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केले आहे, पण तुम्ही मला सांगा जर तुमच्या सारखी चांगली माणसं निवडणूक लढवणार नाहीत, तर मग कोण लढवणार? असा सवाल त्यांनी सिन्हा यांना विचारला. त्यानंतर उपस्थित जनतेला त्यांनी सिन्हा यांनी निवडणूक लढवावी की नाही असा प्रश्न विचारला. जनतेकडून हो उत्तर आले आणि केजरीवाल यांनी सिन्हा यांना थेट निवडणूक लढवण्याची विनंती केली.

यशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीच्या मुद्‌द्‌यावरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाण साधला. यशवंत सिन्हा म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. या एकाच निर्णयामुळे उद्योग-धंदे देशोधडीला लागले आहेत. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्या देशात खोटे बोलणाऱ्यांना भर चौकात उभे करून मारण्याची परंपरा नाही. त्यामुळे आता मतांच्या अधिकारातून खोटे बोलणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)