यशवंत विद्यालयातील विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

जवळार्जून- पवार चॅरिटेबल ट्रस्ट व टाटा ट्रस्ट यांच्या वतीने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या यशवंत विद्यालय मावडी कडेपठार विद्यालयामधील 19 विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच कडेपठार बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना 300 वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. दिगंबर दुर्गाडे, माणिक झेंडे, सुधाकर टेकवडे, राष्ट्रवादी कॉंग्रसचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य सुदाम इंगळे, सोमेश्वर साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन सुधाकर टेकवडे विराज काकडे, बापू भोर, सरपंच वैशाली खोमणे, उपसरपंच मंगला पोटे, हेमलता भामे, चंद्रकांत भामे, सदाशिव जगताप, अमोल चाचर, राम राणे, व्ही. एन. जगताप, किशोर भामे, पोलीस पाटील दादा पांडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शंकर जगताप, मुख्याध्यापक शिवकुमार भोईटे, कावेरी भोसले, एच. एस. जगताप, ए. एम. ढोबळे, मेघमाला सकुंडे, ज्ञानदेव चाचर, रामचंद्र जाधव, एम. व्ही. जगताप आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)