“यशवंत पतसंस्थे’ दीपस्तंभ पुरस्कार

आळेफाटा – पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला प्रथम क्रमांकाच्या राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कारने सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी दिली. लोणावळा येथे राज्य सहकारी फेडरेशनच्या प्रशिक्षण शिबिरात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने 2017-18 चा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ, उपाध्यक्ष फकिर इनामदार, संचालक भिमाजी कोकाटे, आर्थिक सल्लागार लक्ष्मण मंडलिक मुख्य कार्यकारी अधिकारी रंजना मंडलीक व राज्यातील विविध पतसंस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या पतसंस्थेला पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)