यशवंत पतसंस्थेची आळेफाटा येथे शाखा

आळेफाटा -राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या सर्व अत्याधुनिक सुविधा यशवंत पतसंस्थेच्या वतीने पुरविण्यात येत असल्याने सभासद व खातेदारांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंत पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ यांनी केले.
आळेफाटा (ता. जुन्नर) येथे यशवंत पतसंस्थेच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी वाघ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे हे होते. उद्योजक अशोक काठेड यांच्या हस्ते या संस्थेच्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी विघ्नहर साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष भिमाजी गडगे, सुभाष विद्या मंडळाचे अध्यक्ष रमण काकडे, वसंतराव नाईक पतसंस्थेचे अध्यक्ष नेताजी डोके, पंचायत समिती सदस्य श्‍याम माळी, महात्मा फुले पतसंस्थेचे बाळकृष्ण कुऱ्हाडे, बाबुल शेख, पतसंस्था फेडरेशनचे भास्कर बांगर, सुधीर वाव्हळ, शंकर गडगे, सचिन शेलोत, अमोल पाडेकर, सुमित लुनिया, यशवंत पतसंस्थेचे उपाध्यक्ष फकिर इनामदार संचालक अरूण शिंदे, ज्योत्स्ना लेंडे, संजय वाघ, संतोष चोरडिया, प्रकाश तोतरे, राजाराम घोटणे, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी रंजना मंडलीक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण मंडलीक यांनी केले तर छाया कालेकर यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)