तळेगाव-दाभाडे (वार्ताहर) – यशवंतनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती आम्रपाली महिला मंडळाने उत्साहात साजरी केली. प्रशांत उर्फ पप्पू गायकवाड यांच्या स्मरणार्थ यावेळी नेत्र चिकित्सा शिबिर झाले. 450 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.
गरीब, गरजूंना 250 चष्मे वाटण्यात आले. मल्टी ऑप्टॉमसच्या नेत्र चिकित्सक स्वाती गायकवाड, मनीष कुमार, थॉमस भोसले यांनी सहकार्य केले. उल्हास तुळवे प्रस्तूत रिद्म स्टारचा भीमगीत कार्यक्रम झाला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरवले. आम्रपाली महिला मंडळाच्या संस्थापक लता घोलप, अध्यक्ष वैशाली शिंदे, सुशांत ननवरे, अरविंद गायकवाड, धन्वंतरी ननवरे यांनी नियोजन केले.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
What is your reaction?
0
Thumbs up
0
Love
0
Joy
0
Awesome
0
Great
0
Sad
0
Angry