यशवंत धुमाळ यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

मांडवगण फराटा- शिरूर तालुक्‍यातील पांढरेवस्ती-आंधळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यशवंत धुमाळ यांना 2017-18चा पंचायत समिती शिरूरचा गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच शिरूर तालुक्‍याचे पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील हे होते. कार्यक्रमाला सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे, गटविकास अधिकारी संदीप जठार, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, राजेंद्र गदादे आदी उपस्थित होते. यशवंत धुमाळ यांची सेवा दौंड आणि शिरूर तालुक्‍यात झाली असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारिरीक आणि सर्वांगीण विकासासाठी अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहे. आंधळगाव येथील पांढरेवस्ती येथे शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. रांजणगाव सांडस केंद्रातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते. यशवंत धुमाळ यांनी या अगोदर दौंड तालुक्‍यात 6 शाळांत काम केल्यानंतर आंधळगाव येथे 2013 पासून आतापर्यंत ते कार्यरत आहेत. पंचायत समिती सदस्या प्रतिभा शेलार, रांजणगाव सांडस केंद्राचे केंद्रप्रमुख संपतराव सटाले, प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, आंधळगावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादा पांढरे यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)