यशवंत कारखान्याच्या मशीनरी व पार्टची चोरी

पोलीसांत गुन्हा दाखल; दोन लाखांचा माल लंपास

थेऊर- गेली सात वर्षांपासून बंद असलेल्या व सध्या अवसायनात काढण्यात आलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यात चोरट्यांनी तब्बल दोन लाख रुपये किमतीचे सुमारे 500 किलो वजनाची मशीनरी व लोखंडी, पितळी व तांब्याचे पार्ट चोरून नेले आहेत.
सोमवारी (दि. 1) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही चोरी उघडकीस आली. यासंदर्भात यशवंत अवसायकांचे मदतनीस अविनाश वसंतराव इंगळे (रा. 15/4 यशवंत सहकारी साखर कारखाना कॉलनी, थेऊर, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, सदर कारखाना 2011 पासून बंद आहे. सध्या, तो अवसायनात काढण्यात आला आहे. सोमवारी (दि.1) सकाळ सहा वाजण्याच्या इंगळे यांनी नेहमीप्रमाणे चक्कर मारून कारखान्याची पाहणी केली. सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्याशी सुरक्षा रक्षक रामदास बाबुराव कल्यानकर यांनी फोनवरुन संपर्क साधला व कोलवडी पुलानजीक असलेले कारखान्याचे तारेचे कंपाऊंड तोडले असल्याचे सांगितले.
सदर माहिती मिळताच अविनाश इंगळे हे तात्काळ कारखाना परिसरात गेले व पाहणी केली असता त्यांना कारखान्यातील मशीनरी व इतर सामानाचे दोन लाख रुपये किमतीचे लोखंडी, पितळी व तांब्याचे पार्ट चोरून नेले असल्याचे निदर्शनास आले. इंगळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे.

  • यशवंत कारखान्याची होणार इस्पात…
    कोरेगावभिमा-सणसवाडी येथे असलेली लोखंडी काम होणारी फोर्जींग इस्पात कंपनी वेतन मुद्यावरून अचानक बंद करण्यात आल्यानंतर काही वर्षांनी या कंपनीत असलेली मशीनरी तसेच लोखंडी साहित्याची टप्याटप्याने चोरी करण्यात आली. हे साहित्य कोट्यवधींचे होते. कोट्यावधींचे लोखंडी साहित्य चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर इस्पात कंपनीचा सुफडासाफ झाला होता. असाच प्रकार आता यशवंत कारखान्यात सुरू झाला आहे काय, अशी चर्चा या घटनेनंतर होवू लागली आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)