यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार हा जीवनातील अत्युच्च पुरस्कार : देशमुख

कराड – संत आचरणातील व्यक्तिंनी स्वत:चे व्यक्‍तिमहात्म्य कोणाकडून ऐकणे, कौतुक करुन घेणे, स्वत:च्या कार्याची स्तुती स्वत:च्या कानाने ऐकूण घेणे हे प्रशस्त नाही. अशी शिकवण संतांची असते. म्हणून मी पुरस्कार स्विकारत नाही. मात्र शिवम प्रतिष्ठानच्या कार्याचा गौरव व यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या मातृहृदयी व्यक्‍तिच्या नावाचा पुरस्कार म्हणून हा पुरस्कार मी शिवम प्रतिष्ठानचा प्रतिनिधी म्हणून स्विकारला आहे. हा जीवनातील अत्युच्च्य पुरस्कार आहे, असे प्रतिपादन शिवम प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक इंद्रजीत देशमुख यांनी केले.

येथील श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कारफ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे व कालिका कुटुंबप्रमुख मुनीर बागवान-सावकार यांच्या हस्ते इंद्रजीत देशमुख यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंतनु कुलकर्णी, चेअरमन डॉ. जयवंत सातपुते, अरुण जाधव, प्रा. अशोक चव्हाण व संचालक उपस्थित होते. देशमुख म्हणाले, मित्र परिवाराला बरोबर घेऊन यशवंतराव चव्हाणसाहेबांनी समाजातील सामान्य माणसाचे हित जोपासले. देशाच्या राजकारणामध्ये सत्ता हे भोगाचे साधन नाही तर देशासाठी त्यागाचे साधन आहे. ही शिकवण देणारे यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे दुसरे साहेब निर्माण होणार नाहीत.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, इंद्रजीत देशमुख भग्न समाजासाठी काम करत आहेत. वडिलांच्या मालमत्तेचा वारसा न चालवता त्यांच्या कार्याचा वारसा देशमुख यांनी जोपासला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालील शिवम प्रतिष्ठानचे चोखाळलेली वाट ही देवाची आळंदी आहे. देशमुख यांचे चारित्र्य शिवम ब्रॅण्ड झाले आहे. समाजातील अनिष्ट वादळे शमविण्यासाठी अशी चारित्र्य संपन्न व्यक्‍तिमत्वे समाजामध्ये असावी लागतात. या पुरस्कारामुळे आंतरराष्ट्रीय सद्‌भावाचे दूत झाले आहेत. नटश्रेष्ठ मुकुंदराव कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. मानपत्र रचनाकार सुधीर एकांडे व मुकुंदराव कुलकर्णी यांचा डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. संतोष मोहिरे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास बाळासाहेब मोहिरे, श्‍याम वेळापुरे, शरदचंद्र देसाई, अनिल सोनवणे, श्रीमती जयाराणी जाधव, सौ. सिमा विभुते, सुरेश भंडारी, संजय मोहिरे, शिरीष गोडबोले, विवेक वेळापुरे यांच्यासह परिसरातील साहित्यप्रेमी, शिवम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)