यशवंतनगर ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकणार?

अनिल काटे
मेणवली,  –
वाई तालुक्‍यात सर्वात श्रीमंत व मिनी नगरपालिका अशी ओळख असणाऱ्या यशवंतनगर ग्रामपंचायतीचे पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले असून या निवडणुकीत “यशवंत’ होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. उमेदवारांनी तिकीट पदरात पडण्याकरता पक्षीय नेत्यांकडे हालचाली सुरू केल्याने निवडणुकीत रंग भरू लागला आहे.
वाई शहराच्या प्रवेश द्वारावरच टोलेजंग इमारती व बंगल्यानी विखुरलेल्या या कुबेरनगरीत व्यवसायिक, नोकरदार, उच्चभ्रु लोकांचा मोठा रहिवास आहे. 15 सदस्याच्या आर्थिक श्रीमंत ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच पदावर मागास प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे. गेली दोन-तीन टर्ममध्ये यशवंतनगर ग्रामपंचायतीवर प्रामुख्याने राष्ट्रवादी पक्षाचेच प्राबल्य राहिलेले असले तरी मागील पंचवार्षिक कालावधीत सदर ग्रामपंचायत हद्दीत झालेली धनिकांची अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे व अन्य भानगडी या निवडणुकीत मूळ कळीचा मुद्दा ठरली असल्याने राष्ट्रवादीसाठी ही धोक्‍याची घंटा ठरु शकते.
तालुक्‍यात प्रत्येक निवडणुकीत शेवटच्या क्षणी आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादीचा हुकमी एक्का ठरत असल्याने इतर राजकीय पक्षांची नेहमीच गोची होताना दिसते. हे लक्षात घेवून सर्व पक्षीय नेत्यांकडून आघाडीचे सूतोवाच केले जात असले तरी अंतिमक्षणी तिकीट वाटपावरून आघाडीत बिघाडी होवून नेहमीप्रमाणे यशवंतनगर निवडणुकही राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडू शकते हे नाकारून चालणार नाही. प्रत्येक निवडणुकीत कॉग्रेस कार्यकर्ते जीवाची बाजी लावून जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतात परंतु दरवेळी पक्षाला ताकदीचे नेतृत्वच मिळत नसल्याने निष्ठावान कार्यकर्त्याला पराभवाला सामोरे जावे लागून सत्तेपासून नेहमी चारहात लांबच रहावे लागते. उमेदवार मिळवण्यापासून ते जिंकण्यापर्यंत कॉंग्रेसची रणनिती कितपत यशस्वी होणार? याची चर्चा मतदारांमध्ये सुरु आहे.
देशात भाजपची लाट असली तरी वाई तालुक्‍यात ती कधीच जाणवली नाही.
स्थानिक भूमिपुत्र पंढरीनाथ घाटे व कुटुंबाची स्वतंत्र भूमिका यशवंतनगर निवडणुकीमध्ये नेहमीच महत्वाची ठरत असलेने सत्तेसाठी राष्ट्रवादी घाटे यांना बरोबर घेणार का? का घाटे आघाडी बरोबर राहणार? तर दुसरे स्थानिकपुत्र सावंत यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये सावंत पॅटर्नचा हट्ट धरल्याने राष्ट्रवादीतूनच नाराजीचा सूर निघत असल्याने आमदारांची जादूची कांडी कशी फिरणार व कितपत यशस्वी होणार हे सांगणे कठीण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)