यशवंतनगरमध्ये आमदारांचा करिष्मा

यशवंतनगर : बिनविरोध उमेदवारांसह आमदार मकरंद पाटील व इतर मान्यवर. (छाया : धनंजय घोडके)

राष्ट्रवादीचे पाच सदस्य बिनविरोध : 26 रोजी मतदान
वाई, दि. 15 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍याच्या महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या यशवंतनगर ग्रामपंचायतीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेचे पाच उमदेवार बिनविरोध झाले आहे. निवडणुकीपूर्वीच पाच उमेदवार बिनविरोध झाल्याने यशवंतनगरमध्ये आमदार मकरंद पाटील यांचा करिष्मा पुन्हा दिसला आहे.
वाई तालुक्‍यातील सात ग्रामपंचायतींचा निवडणुका जाहिर झाल्या आहेत. यामध्ये यशवंतनगर, शहाबाग, वेळे, अमृतवाडी, पाचवड, चांदवडी (पुर्न.), धोम (पुर्न.) इत्यादी गावांचा समावेश असून शनिवार दि. 15 रोजी अर्ज मागे घेणे व चिन्ह वाटप प्रक्रिया होती. आमदार मकरंद पाटील यांच्या करिश्‍म्याने अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी यशवंतनगर 15 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलचे पाच उमदेवार मेघा सचिन सावंत, योगेश लाखे, सुवर्णा राहुल गाडे, वैशाली गायकवाड व दिलीप मदने हे यशवंतनगर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्याने विरोधाकांना पहिला धक्का बसला आहे. यशवंतनगर ग्रामपंचायत ही सर्वात मोठी ग्रामपंचायत असून तिला मिनी नगरपालिका असेही म्हटले जाते. सर्व पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. मतदान 26 सप्टेंबरला मतदान तर मतमोजणी 27 रोजी होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)