यवत येथे युवतीची आत्महत्या

यवत, दि. 12 (वार्ताहर) – येथे एका मुलीने राहत्या घराच्या अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (मंगळवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. निलम नाना खुडे (वय 17 रा. यवत, ता. दौंड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. निलम ही नुकतीच 12 वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली होती. तिला यावेळी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्‍टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. संतोष वसंत खुडे यांनी यवत पोलिसांना घटनेची माहिती दिली. या मुलीने केलेल्या आत्महत्ये मागील कारण समजू शकले नाही. पुढील तपास सहाय्यक फौजदार विठ्ठल जगताप करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)