यवत येथे भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी

यवत – दौंड तालुक्‍यातील यवत येथे गुरुवारी (दि.29) जैन समाजाने एकत्र येत भगवान महावीर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यवतमधील श्वेतांबर आणि दिगंबर या दोन समाजांनी एकत्र येत सायंकाळी गावातून महावीर यांच्या मूर्तीची मोठ्या उत्साहात रथातून मिरवणूक काढली. दरम्यान, सकाळी भगवान महावीर मंदिरात अभिषेक पूजा, आरती आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. यासाठी मंदिर सुशोभित करण्यात आले होते. सायंकाळी मोठ्या उत्साहात भगवान महावीर यांच्या मूर्तीची श्वेतांबर आणि दिगंबर समाजाने एकत्र येऊन रथामधून मिरवणूक (वरघोडा) काढण्यात आली. सुमधुर वाद्यांच्या आवाजात ही मिरवणूक गावातील बाजारपेठेतून मोठ्या उत्साहात वाजत-गाजत काढली. भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त कासुर्डी येथील दीपगृह सोसायटी (आश्रम शाळा) अनाथालयातील मुलांना अन्नदान करण्यात आले. यावेळी दिगंबर समाजाचे अध्यक्ष रमेश जैन, श्वेतांबर समाजाचे अध्यक्ष राजेंद्र सुमतीलाल शहा, रविंद्र शहा, जितेंद्र शहा, निलेश जैन, नरेंद्र जैन, विनोद जैन, रमेश शहा, भरत शहा व सर्व जैन समाज, तरुण तरुणी व महिला वर्ग या मिरवणुकीत सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)