यवत येथे कालव्यात मृतदेह आढळला

यवत – खडकवासला धरणाच्या मुळा-मुठा कालव्याच्या पाण्यावर तरंगताना (यवत, ता. दौंड) गावच्या हद्दीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आज दुपारी 1:30च्या सुमारास आढळून आला.

या अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे वयाचे असून अंगात पिवळसर रंगाचा नेहरू शर्ट तसेच पांढऱ्या रंगाचा पायजमा घातलेला आहे. या पुरुषाची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. या घटनेची माहिती विठ्ठल राघू कारंडे (वय 26, रा. यवत, कुदळेमळा, ता. दौंड) यांनी यवत पोलिसांना दिली. या अनोळखी पुरुषाविषयी कोणास अधिक माहिती असल्यास यवत पोलीस ठाणे (02119 – 274233) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)