यवतेशवर येथे नाकाबंदीत दारू जप्त

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी)
साताऱ्याहून यवतेश्‍वरमार्गे बामणोलीला घेऊन निघालेली दारू सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्‍वर पोलिस चौकीजवळ सुरू असलेल्या नाकबंदीत पकडली असून संशयीताच्यांकडून देशी दारू व वाहतुकीला वापरलेली ओमनी कार जप्त केली आहे.
जितेंद्र राजेंद्र वैराट रा. सोमवार पेठ, सातारा व स्वप्नील उर्फ गुंड्या कदम रा. मंगळवार पेठ, सातारा हे दोघे बामणोली येथे विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या ओमनी कार क्रं. एम एच 11 बीव्ही 1045 मधून साताऱ्याहून निघाले होते. या घटनेची माहिती सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रदीप जाधव यांना मिळाली होती त्यानुसार त्यांनी स.पो.नि. शाळीग्राम, पो.कॉ. सुहास पवार, रमेश शिखरे, निखील घाडगे, संदीप कुंभार यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ यवतेश्‍वर पोलिस चौकी जवळ नाकाबंदी करून ओमनी कारसह देशी दारू असा एकूण 83 हजार सातशे आठ्‌ठवीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)