यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठा योजनेला अमृत योजनेतून मान्यता

यवतमाळ पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने मार्गी लावण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई: यवतमाळ शहराला पाणीपुरवठा प्रकल्पासाठी अमृत योजनेतून करण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम येत्या मार्चपर्यंत पूर्ण करण्यासाठी कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.

यवतमाळ शहराच्या पाणीपुरवठा योजनेला अमृत योजनेतून मान्यता देण्यात आली आहे. या योजनेची आढावा बैठक आज मंत्रालयात देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी यवतमाळचे पालकमंत्री तथा सामान्य प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू आदी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 देवेंद्र फडणवीस म्हणाले, यवतमाळ शहराला व समाविष्ट आठ गावांना बेंबळा धरणातून पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेतून आतापर्यंत 52 टक्के काम पूर्ण झाले आहे. यवतमाळमधील टंचाई परिस्थिती पाहता शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी जलवाहिनीची कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी नियोजन करण्यात यावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)