यमाईदेवीच्या पालखीचे किन्हईस प्रस्थान

औंध ः श्री यमाईदेवीची पालखी साखरगडनिवासिनी अंबाबाईच्या भेट सोहळ्यात सहभागी झालेले भाविक.

औंध, दि. 22 (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे आराध्य दैवत व औंध येथील श्रीयमाई देवीच्या पालखीचे साखरगडनिवासिनी अंबाबाई (किन्हई) येथे भेट सोहळ्यास सर्व मानकऱ्यांच्या समवेत प्रस्थान झाले.
औंध येथे गुरुवारी सायंकाळी चार वाजता यमाई मंदिरामध्ये मानकऱ्यांच्या समवेत मंदिरात पूजा करून उत्सव मूर्ती पालखी प्रस्थान करण्यात आली. देवीच्या मंदिरातून देवीची पालखी उदं बोला उदंच्या गजरात वाजत गाजत मानकऱ्यांच्या समवेत गावातून निघाली. गावातील महिला पुरुष यावेळी दर्शनासाठी व प्रस्थानासाठी गावाच्या वेशीपर्यंत आली होती. वेशीवर पालखी थांबून सर्व गावकरी महिला पुरुष बाल-वृद्ध व सर्व मानकरी यांनी देवीचे दर्शन घेऊन महिलांनी देवीची ओटी भरुन महिलांचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला व पालखी पुढील किनईच्या पायी प्रवासास प्रस्थान झाली.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)