यकृत प्रत्यारोपणावर कार्यशाळा

चिंचवड – इंडियन मेडिकल असोसिएशन पिंपरी, चिंचवड, भोसरी शाखा व ज्युपिटर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने यकृत प्रत्यारोपण या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लिव्हर तज्ञानी, यकृताचे आजार, त्यावरील सर्जरी, उपचार व नवीन तंत्रज्ञान वापरून केली जाणारी यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत शंभरहून अधिक डॉक्‍टरांनी सहभाग घेतला. विविध औषधांचे यकृतावर होणारे दुष्परिणाम, यकृताचा कॅन्सर, भुलशास्त्र आणि यकृत प्रत्यारोपण, एमआरआय तंत्रज्ञान आदींवरही यावेळी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. अवयवदानावेळी अवयव त्वरित पोहचवण्यासाठी करण्यात येणारी व्यवस्था ( ग्रीन कॉरीडॉर ) यावर लघुचित्रपट दाखविण्यात आला. तसेच यावेळी आयएमएपीसीबीच्या स्पंदन मासिकाचा अंक प्रकाशित करण्यात आला.

यावेळी डॉ.सुनील राव, डॉ.संजय देवधर, डॉ.दिलीप कामत, डॉ. संजीवकुमार पाटील,डॉ.माया भालेराव, डॉ.सचिन कोल्हे, डॉ.शुभांगी कोठारी, डॉ.मिलिंद सोनवणे आदी उपस्थित होते. डॉ.सलील पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. संजीव दात्ये यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)