नवी दिल्ली : यंदाच्या वर्षात भारताचा विकासदर ७.३ टक्के इतका राहील, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. याशिवाय २०१९ आणि २०२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ७.५ टक्के वेगाने वाढेल, असाही अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे.

जागतिक बँकेच्या मते, जीएसटी लागू झाल्यामुळे भारतातील अर्थव्यवस्थेवर प्रभाव पडला होता. याचा नकारात्मक परिणाम दिसून आला होता. परंतु, अर्थव्यवस्था यातून बाहेर पडत असून आर्थिक वर्ष २०१९ मध्ये विकास दर ७.४ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो.

दरम्यान, भारताच्या आर्थिक वाढीचा वेग स्थिर असेल. जागतिक स्तरावर आर्थिक मुसंडी मारायची असल्यास, भारताने गुंतवणूक आणि निर्यात वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असे जागतिक बँकेचा अहवाल सांगतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)