यंदा संक्रातीलाही भरणार महापौर बचत बाजार

पुणे – महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेकडून पाहिल्यांदाच मकर संक्रातीच्या निमित्ताने महापौर बचत बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुमारे साडेचार हजार बचतगट कार्यरत आहेत. या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या उद्देशाने महापालिकेकडून दरवर्षी दिवाळीमध्ये शहरात पाच ठिकाणी महापौर बचत बाजार भरविले जातात. मात्र, वर्षातून एकदाच हा उपक्रम ना ठेवता तीन ते चार वेळा तो असावा अशी मागणी केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन महापौरांनी स्वतः पुढाकार घेत यावर्षी मकरसंक्राती निमित्ताने हा बचत बाजार आयोजित केला आहे. येत्या 11 ते 13 जानेवारी या कालावधीत हा बचत बाजार शहराच्या चार ठिकाणी होणार असून त्यात सुमारे 1 हजाराहून अधिक बचतगट सहभागी होणार आहे.

या ठिकाणी भरणार महापौर बचत बाजार
– नानासाहेब पेशवे जलाशय, कात्रज- कोंढवा रस्ता
– बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर
– कै. नथुजी मेंगडे, जलतरण तलाव, कर्वेनगर
– प्रीमरोज मॉलच्या मागे, बाणेर गावठाण

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चार ठिकाणी हे बाजार भरविण्यात येणार असून सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत ते सुरू असणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)