यंदा श्री विसर्जन मिरवणूक नगरपालिकेपासून

सातारा ः गणेश मंडळांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना पो.नि. नारायण सारंगकर शेजारी माधवी कदम व मान्यवर. (छाया ः संजय कारंडे)

मुर्तीच्या उंचीवर नुसतीच चर्चा, प्रत्येक मंडळाला मिळणार टोकन

मुर्तीदान उपक्रमासाठी
संस्कार प्रतिष्ठान आग्रही,

रिसालदार तळ्यावर
श्री विसर्जनाचा निर्णय

सातारा, दि. 12 (प्रतिनिधी) – यंदा श्री विसर्जन मिरवणूक नगरपालिकेपासून सुरु होणार असून प्रत्येक मंडळाला टोकन मिळणार आहे.गणेशोत्सवाबाबत बोलावण्यात आलेल्या बैठकीम मुर्तीच्या उंचीवर नुसतीच चर्चा झाली.पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी सातारा नगर परिषदेच्यावतीने आयोजित गणेश मंडळा च्या बैठकीत केले, या वेळी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, मुख्याधिकारी शंकर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने, पोनि, नारायण सारंगकर, वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश घाडगे, एमएसीबी चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने, विरोधी पक्षनेते अशोक मोने, नगरसेविका स्मिता घोडके, नगरसेवक राजू भोसले, मनोज शेंडे, भाजपचे गट नेते मिलिंद काकडे, सिद्धी पवार, विजय काटवटे काही गणेश मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्षानी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी मुख्यलयामागील रिसालदार तळ्यात गणेश विसर्जन करण्यास परवानगी दिल्या बद्दल त्याचे आभार मानले. मंडळांना कमी आकाराच्या मूर्ती बनवण्याकरता प्रत्येक वर्षी आवाहन केले जाते मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. 3 ते 4 फूट उंचीच्या मुर्त्या बनविण्याचा अवलंब सर्व मंडळांनी केला पाहिजे.या वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकी करता प्रत्येक मंडळांना टोकन दिले जाणार आहे, त्या वर नंबर असणार आहेत, त्या प्रमाणे एका रांगेत मंडळे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतील. या अगोदर सर्व रस्त्यावरील खड्डे मुजवणे, वाहतूक मार्गावरील धोकादायक झाडाच्या फांद्या छाटने, या बाबत पालिका उपायोजना करणार आहे. प्रत्येक वर्षी प्रमाणे सर्व मंडळाचे निर्माल्य एकत्रित रित्या गोळा करण्याची व्यवस्था केली आहे. सातारा शहरातील सर्व नागरिकांनी मंडळांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पूरक साजरा करण्यासाठी सहकार्य करावे असेही नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या,
उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने म्हणाले, तीन एस म्हणजेच स्वच्छता, सहकार्य, आणि सुव्यवस्था चा अवलंब सर्व गणेश मंडळींनी केला पाहिजे. गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबतीत पोलीस विभाग मागे राहणार नाही, जो असुरक्षितता निर्माण करेल त्याना सोडणार नाही.
पुणे येथील संस्कार प्रतिष्ठान चे डॉ, मोहन गायकवाड, यांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव म्हणजे काय तो कसा साजरा करावा या बाबत माहिती सांगितली. दै प्रभातच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची माहिती दिली आहे. व ज्या उपाय योजना सुचवल्या त्याचा प्राधान्याने अवलंब केला पाहिजे असे सांगितले.
पोनि सारंगकर म्हणाले, दर वर्षी प्रमाणे राजवाड्यावरुन सुरुवात न करता नगरपालिका पासून गणेशविसर्जन मिरवणुक सुरु करण्यात येईल. त्याचा मार्ग नगरपरिषद ,कमानी हौद, शनिवार चौक, शेटे चौक, ते पोलीस मुख्यालय तळे असा असेल.
विरोधी पक्ष नेते अशोक मोने म्हणाले,मिरवणुकीचा मार्ग जुना आहे तसाच ठेवावा. सातारकारांना मिरवणुुक चांगल्या प्रकारे पाहता येईल, मिरवणूक 12 च्या आतच होणे आवश्‍यक आहे. मोठ्या मंडळांनी मिरवणुकीला लवकरच बाहेर पडावे. मिरवणुकीला शिस्त लावण्याकरिता प्रत्येक मंडळाला एक पोलीस द्यावा, सातारा शहरात रस्ते अरुंद आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील अशी काळजी घ्यावी. मिरवणूक दरम्यान असलेली रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढावीत.
सिद्धी पवार म्हणाल्या, वृक्ष समितीच्या माध्यमातून टेंडर काढून वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वायरी, तसेच वृक्षाच्या फांद्या काढण्यात याव्यात. पोहण्याच्या तलावात घरगुती गणेशाचे विसर्जन होते, त्याचा गाळ काढून घेणे, गरजेचे आहे, प्रदूषण महामंडळाच्या निर्देशाप्रमाणे ज्यांनी अवलंब केला नाही अशा मंडळांना नोटीस बाजवल्या आहेत का? त्या मंडळावर केसेस काही केल्या किंवा त्याबाबत विचार करावा.
वीज वितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जितेंद्र माने म्हणाले, सर्व गणेश मंडाळाना चांगले सहकार्य होईल, गणेशाचा मंडप उभारताना वीज वाहक ताराच्या खाली तो उभारू नये. मिरवणूक काळात उंचीच्या डेकोरेशन मुळे वीजपुरवठा बंद करावा लागतो.त्या मुळे मंडळांनी काळजी घ्यावी.
स्मिता घोडके म्हणाल्या- मंडळांनी मंडपाची परवानगी मांडव टाकायच्या अगोदर घ्यावी, मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना प्रबोधनात्मक देखाव्याचे सादरीकरण करावे. प्रत्येक मंडळाने आपल्या मंडळाच्या परिसरात स्वछता राखावी तसेच जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पालिकेला तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)