यंदा मार्च महिन्यात रंगणार आयपीएलचा थरार

नवी दिल्ली: भारतात एप्रिल-मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असल्या तरीही यंदाच्या आयपीएलचे सर्व सामने हे भारतातच होणार आहेत. आज बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीची दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. 23 मार्चपासून या स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचे सांगितले जात आहे.

प्रशासकीय समितीच्या सदस्यांची आज नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान आयपीएल सामन्यांची ठिकाणे आणि वेळापत्रक याबाबत चर्चा झाली. या बैठकीतील प्राथमिक चर्चेनंतर विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल स्पर्धा ही भारतातच खेळवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यासह या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही चर्चा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी 2019 साली होणारी आयपीएल भारतामध्ये होणार नाही, अशी चर्चा सुरू होती.

त्यावेळीही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी आयपीएल भारतामध्येच खेळवण्यात येईल, असे स्पष्ट केले होते. मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयने आयपीएल भारतात होणार असल्याचे स्पष्ट झाले. मे महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेता ही स्पर्धा यंदा लवकर सुरू हाईल. त्याचबरोबर लीगचे अंतिम वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयच्या प्रतवक्‍त्यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)