यंदा दोन महिने आधीच आला रत्नागिरी हापूस

पुणे – गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात रत्नागिरी हापूस आंबा दाखल झाला आहे. याच्या 2 डझनाच्या एका पेटीस 2,100 रुपये भाव मिळाला.

फेब्रुवारीपासून रत्नागिरी हापूसची आवक सुरळीत सुरू होते. सध्या हंगामपूर्व रत्नागिरी हापूस बाजारात दाखल होत असून बाजारात जानेवारीपर्यंत हंगामपूर्व हापूसची तुरळक आवक होत राहील, असा अंदाज शेतकरी व व्यापारी व्यक्त करीत आहेत.

-Ads-

गुलटेकडी मार्केटयार्डात रविवारी रत्नागिरी येथील बानकोट खाडी भागातून शेतकरी सत्तार हाजवानी यांच्या बागेतून आडते सौरभ कुंजीर यांच्या गाळ्यावर रत्नागिरी हापूस आंब्याच्या 2 डझनाच्या 6 बॉक्‍सची आवक झाली. खरेदीदार, रावसाहेब कुंजीर यांनी दोन डझनास 2,100 रूपये याप्रमाणे हापूसची खरेदी केली.

याबाबत कुंजीर म्हणाले, “रत्नागिरी हापूस दरवर्षी जानेवारीत दाखल होतो. यंदा मात्र दोन महिने अगोदर रत्नागिरी हापूसची आवक झाली आहे. गेल्यावर्षी बाजारात हंगामपूर्व दाखल झालेल्या हापूसच्या डझनाच्या एका पेटीस सुमारे साडेतीन हजार रुपये भाव मिळाला होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात एका डझनामागे 1,150 रुपयांनी घट झाली आहे. यंदा पोषक हवामानामुळे आंब्याचे उत्पादन वाढणार असून यंदा जानेवारीपासून हापूसची सुरळीत सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरूवातील आंब्याला चांगले भाव मिळतील. त्यानंतर आवक वाढून हे भाव आवाक्‍यात येतील.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)