यंदा आगीच्या घटना घटल्या

पिंपरी – नागरिकांची जागरुकता व अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे चालू वर्षात आगीच्या घटना घटल्या आहेत. मागील आठ महिन्यात आगीच्या साडेसहाशे आगीच्या घटना घडल्या. यंदा न्यायालयाने फटाके वाजवण्यावर आणलेल्या मर्यादेमुळे दिवाळीत फटाक्‍यांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळेही आगीच्या एकुण घटना कमी झाल्याचा दावा अग्निशमन दलाने केला आहे.

वर्षाच्या सुरवातीला मार्च, एप्रिल व मे यादरम्यान आगीच्या घटना वाढलेल्या असतात. मात्र यावर्षी एप्रिल महिन्यात 100 आगीच्या घटना घडल्या. तर त्या खालोखाल मार्च महिन्यात 84, मे महिन्यात 88 आगीचे कॉल आले होते. तर ऑक्‍टोबर महिन्यात 60 आगीच्या घटना घडल्या. या व्यतिरिक्त रस्त्यावर ऑईल सांडणे, रेस्क्‍यू, अपघात ठिकाणी मदत करणे अशा विविध प्रकारच्या 387 घटनांची वर्दी अग्निशमन दलाला मिळाली आहे.
बिजलीनगर येथेल आगीत जिवीतहानी झालेल्या घटनेनंतर शहरात कुठलीही आगीची मोठी घटना घडली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक वसाहत आणि वाढते शहरीकरणामुळे अग्निशमन दलाला सदैव तत्पर राहावे लागत आहे. चिखली येथे नुकत्याच झालेल्या उपविभाग केंद्रामुळे मोठी मदत झाली. चिखली येथील भंगार गोदामे आणि मोशी कचरा येथे उन्हाळ्यात व दिवाळीच्या दरम्यान आगीच्या घटना घडतात. परिणामी, दलाची मोठी धावपळ होते. मात्र, यंदा दिवाळीच्या काळात तेथे कर्मचारी राखीव ठेवण्यात आले होते.

वाढत्या लोकसंख्येच्या मानाने अग्निशन दल अपुरे पडत आहेत. संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसह अनेकवेळा लगतच्या भागातही कॉल येतो. यंदा महापालिका हद्दीबाहेरी 10 ठिकाणी अग्निशमन दल पोहचले आहे. शहरातील साधारण वीस ते बावीस लाख लोकसंख्येच्या मानाने केवळ 135 कर्मचारी आहेत. दुसरीकडे आगीबरोबरच यंदा रेस्क्‍यू घटनाही हाताळाव्या लागत असल्याने मोठा ताण या विभागावर आहे.

आगीच्या घटना कमी असल्याचे महत्वाचे कारण म्हणजे जनजागृती झाली आहे. नागरिक अनेकदा स्वतःहून तत्परता दाखवून आम्हाला कळवतात. त्याबाबत अग्निशमन दलाकडून मध्यंतरी पेट्रोलिंग केले होते. तर, दुसरीकडे चिखली उपकेंद्र सुरु झाल्याने आगीवर तातडीने नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
– किरण गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, महापालिका.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)