यंदा ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चा कार्यकम देहराडूनमध्ये होणार

देहराडून : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने देहराडूनची निवड केली आहे. योग दिनाच्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. यासंबंधी आयुष मंत्रालयाचे सचिव कोटेचा यांनी उत्तराखंडच्या मुख्य सचिवांना कळवले आहे.

देहराडून यंदाच्या योग दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकमाचे केंद्र असेल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी देखील याची माहिती जाहीर केली आहे. उत्तराखंडबद्दल मोदी आणि त्यांच्या सरकारला विशेष आपुलकी आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान देहराडूनमध्ये असणार आहेत.

योग दिनाचा कार्यक्रम वन संशोधन संस्थेच्या परिसरात आयोजित होऊ शकतो, अशी माहिती त्यांनी दिली. योग प्रशिक्षण संस्थांचे उत्तराखंडमध्ये प्रमाण लक्षणीय असून विदेशी नागरिकांचा तेथील सहभाग देखील तुलनेने मोठा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)