यंदाही पुणेकरांवर करवाढीचा बोजा!

स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला प्रस्ताव

पुणे – पुणेकरांना यंदाही करवाढीची भेट दिली जाणार आहे. यात 15 टक्के पाणीपट्टी वाढ तसेच घनकचरा व्यवस्थपानाच्या “युजर चार्जेस’चा प्रस्ताव आहे. हा विषय महापालिका प्रशासनाने मंगळवारी स्थायी समितीमध्ये सादर केला. मात्र, समितीने त्यासाठी खास सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार, “पाणीपट्टीत सुमारे 200 ते 300 रुपयांची वाढ होणार आहे. प्रशासनास कोणत्याही कराच्या रकमेत वाढ अथवा सवलत द्यायची असल्यास, त्याबाबतच्या प्रस्तावास 20 फेब्रुवारीपूर्वी स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता आवश्‍यक असते. त्यानुसार, प्रशासनाकडून हा करवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्यात हे 2 कर वगळता इतर कोणत्याही करात वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.’

समान पाणीपुरवठा योजनेसाठी पाणीपट्टीत वाढ
महापालिकेकडून शहरात समान पाणी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 2,500 कोटींचा खर्च येणार असल्याने महापालिकेने पाणीपट्टीत 100 टक्के करवाढ प्रस्तावित केली होती. त्यास 2016 मध्ये मान्यताही देण्यात आली आहे. मात्र, ही दरवाढ एकाच वेळी न करता त्यात टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, पहिली पाच वर्षे प्रत्येकी 15 टक्के, तर शेवटच्या वर्षी 25 टक्के वाढ केली जाणार आहे. त्यानुसार, 2017 पासून दरवर्षी पाणीपट्टीत 15 टक्के वाढ केली जात असून 2019-20 या आर्थिक वर्षातही 15 टक्के वाढ केली जाणार आहे,’ असे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे.

“युजर चार्जेस’लाही घेणार मान्यता
घनकचरा व्यवस्थापनासाठी लागणारा खर्च आणि मिळकतकरातून जमा होणारे शुल्क यात मोठी तफावत आहे. त्यामुळे प्रशासनाने 2019-20 पासून नागरिकांकडून “युजर चार्जेस’ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला होता. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असल्याने स्थायी समितीने हा प्रस्ताव पक्षनेत्यांकडे पाठविला आहे. त्यास अजून पक्षनेत्यांनी मान्यता दिलेली नाही. मात्र, 20 फेब्रुवारीपूर्वी मान्यता न घेतल्यास या प्रस्तावाची अंमलबजावणी करणे शक्‍य होणार नाही, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा “युजर चार्जेस’चा प्रस्तावही मान्यतेसाठी ठेवण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)