यंदाच्या वर्षी अक्षय कुमारचा “पंच’

बॉलीवूडमधील इंटरनॅशनल खिलाडी अक्षय कुमारसाठी 2018 हे वर्ष खुपच यशस्वी ठरले. गतवर्षात त्याच्या पॅडमॅन, गोल्ड आणि 2.0 या चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमविला. अन्य स्टार कलाकार अर्थात सलमान खान, आमिर आणि शाहरुख यांच्यासाठी हे वर्ष जास्त फलदायी ठरले नाही. या तुलतेन अक्षय कुमारच खरा “सुपरस्टार’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गतवर्षानंतर आता यंदाचे वर्षही अक्षयसाठी लकी ठरण्याची शक्‍यता आहे. कारण या वर्षी त्याचे एक-दोन नाही तर, तब्बल पाच चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

येत्या वर्षात त्याचा पहिला चित्रपट “केसरी’ प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सारागड लढाईच्या सत्य घटनेवर आधारित आहे. त्यानंतर भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेवर आधारीत “मिशन मंगल’ येईल. यात अक्षय सोबत सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, किर्ती कुल्हारी, तापसी पन्नू आणि शरमन जोशी यांच्याही भूमिका आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अक्षय कुमार आणि करिना कपूर ही जोडी बऱ्याच काळानंतर एकत्र दिसणार आहे. मुलाला जन्म देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या एका जोडप्याची ही कथा आहे. कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांझ यांच्याही भूमिका असलेला “गुड न्यूज’ प्रदर्शित होईल. त्या पाठोपाठ हाऊसफुल्ल सीरीजमधील “हाऊसफुल्ल-4′ आणि “सूर्यवंशी’ चित्रपट येण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)