यंदाच्या मान्सुनमध्ये आत्तापर्यंत 868 बळी

नवी दिल्ली – यंदाच्या मान्सुनमध्ये देशाच्या विविध भागात आलेल्या पुरामुळे तसेच दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे आत्तापर्यंत एकूण 868 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यात सर्वाधिक बळी 247 केरळात गेले आहेत अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली. पुरामुळे केरळातील 14 जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून 32500 हेक्‍टर पिकावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

यंदा आत्तापर्यंत उत्तरप्रदेशात 191, पश्‍चिम बंगाल मध्ये 139, महाराष्ट्रात 139, गुजरात मध्ये 52, आसाम मध्ये 45 आणि नागालॅंड मध्ये 11 जण ठार झाले आहेत. केरळातील 33 जण अद्याप फरारी असून पश्‍चिम बंगालमधील 5 जण बेपत्ता आहेत. विविध राज्यांमध्ये पावसाशी संबंधीत घटनांमध्ये 247 जण जखमी झाले आहेत. पुराचा सर्वात मोठा फटका बसलेल्या केरळात विविध ठिकाणी पुरग्रस्तांसाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या असून त्यात दोन लाख लोकांनी आश्रय घेतला आहे. राष्ट्रीय आपत्ती दलाच्या 43 तुकड्या आणि 163 बोटी तेथील मदत कार्यात गुंतल्या आहेत.

हवाईदलाची 23 हेलिकॉप्टर्स, आणि 11 मालवाहतूक विमाने तेथील कार्यात तैनात करण्यात आली असून भारतीय नौदलाच्या 51 बोटी आणि असंख्या नौसेनीक केरळातील मदत कार्यात गुंतली आहेत अशी माहितीही गृहमंत्रालयातर्फे देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)