यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला १० देशाचे राष्ट्रप्रमुख राहणार उपस्थित

नवी दिल्ली- आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशातील नागरिकांशी संवाद साधला.आज मन की बातच्या सुरवातीलाच नरेंद्र मोदी यांनी, जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.ही  पंतप्रधानांची सरत्या वर्षातील शेवटची ‘मन की बात’ आहे.

दरम्यान आज मोदी यांनी  आपल्या  मन की  बात मधून  येणाऱ्या  प्रजासत्ताक दिनी आसियान देशांच्या सर्व राष्ट्र  प्रमुखांना आमंत्रित करणार असल्याची माहित दिली यावेळी बोलताना  ते  म्हणाले  की प्रजासत्ताकदिनी एखाद्या परदेशी राष्ट्रप्रमुखाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावण्याची प्रथा जुनीच असून,  यंदा प्रथमच आपण आसियान गटातील   तब्बल १० देशाच्या  राष्ट्र  प्रमुखांना प्रजासत्ताक दिनासाठी बोलवणार आहोत.

-Ads-

दरम्यान दक्षिण पूर्व आशियाई राष्ट्र संघटना किंवा आसियान या गटात इंडोनेशिया, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, म्यानमार, व्हिएतनाम, फिलिपिन्स, ब्रुनेई, कंबोडिया आणि लाओस  या १० देशांचा समावेश होतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)