यंदाच्या आयपीएलमध्ये युवराज कोणत्या संघात?

जयपूर: सिक्‍सर किंग म्हणून ओळखला जाणारा युवराज सिंग मागील काही वर्षांपासून भारतीय संघाच्या बाहेर आहे. त्याने भारतासाठी शेवटचा सामना जून 2017 मध्ये खेळला होता. त्यातच रणजी सामने आणि देशांर्तगत क्रिकेटमध देखील त्याला विशेष कामगिरी करता आले नाही.

इंडियन प्रीमियर लीग 2019 खेळाडूंची बोली प्रक्रिया 18डिसेंबर जयपूर येथे होणार आहे. युवराजची आयपीएल मधील मूलभूत किंमत सध्या 1 कोटी आहे. गतवर्षी ती 2 कोटी होती. युवराज मागील आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघातून खेळला होता. यावेळी त्यांनी त्याला करारातून मुक्त केले आहे.

मागील मोसमात युवराजने 8 सामन्यात फक्त 65 धावा केल्या होत्या. त्यामुळे 37 वर्षीय युवराज सिंग ला कोण संघात घेणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. 1 कोटी मूलभूत किंमत असणाऱ्या अन्य भारतीय खेळाडूंमध्ये अक्षर पटेल, मोहमद शमी, वृद्धिमान सहा यांचा समावेश आहे. 2 कोटी मूलभूत किंमत असणाऱ्या खेळाडूंमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही हे विशेष !


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)