यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’10 खेळाडूंवर बोली लागली नाही

बंगळुरु : यंदाच्या आयपीएल मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव पार पाडला. अनेक युवा खेळाडू या आयपीएलमध्ये संधी मिळाली आहे तर काही दिग्गज खेळाडूंना या लिलावात खरेदीदार मिळाला नाही, ज्यामुळे सर्वांच आश्चर्य वाटत आहे.

* ईशांत शर्मा : टीम इंडियाचा गोलंदाज ईशांत शर्मालाही खरेदीदार मिळाला नाही. त्याची बेस प्राईस 75 लाख रुपये होती.
* कोरी अँडरसन : न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज कोरी अँडरसनला प्रेक्षक या आयपीएलमध्ये मिस करतील. 2017 मध्ये त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती.
* लसिथ मलिंगा : श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगावर एकाही संघाने बोली लावली नाही. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना अनेक सामने गाजवले आहेत. त्याची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती.
* इश सोधी :
 जगातला नंबर वन टी-20 गोलंदाज इश सोधीलाही खरेदीदार मिळाला नाही. त्याची बेस प्राईस 50 लाख रुपये होती.
* डेल स्टेन : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन यावेळी आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. गेल्या अनेक दिवसांपासून तो दुखापतीला तोंड देत आहे. त्यामुळे त्याच्यावर कुणीही बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 1 कोटी रुपये होती.
|* ईयॉन मॉर्गन : इंग्लंडचा वन डे कर्णधार ईयॉन मॉर्गनवरही फ्रँचायझींनी बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 2 कोटी रुपये होती.
* ज्यो रुट :
 इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट त्याच्या पहिल्याच आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.|
*  जोश हेझलवूड : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडकडेही फ्रँचायझींनी दुर्लक्ष केलं. त्याने नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेत दमदार कामगिरी केली होती. मात्र 2 कोटी रुपये बेस प्राईस असलेल्या हेझलवूडलाही खरेदीदार मिळाला नाही.
* हाशिम आमला : कामगिरीत नेहमी सातत्य राखणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाही अनसोल्ड राहिला. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.
* जॉनी बेअरस्टो : इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोवरही कुणी बोली लावली नाही. त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)