यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेपाळी क्रिकेटरचा समावेश

बंगळुरु :  आयपीएलमध्ये प्रसिद्ध खेळाडूंची नेहमीच चर्चा होत असते. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आता एका नव्या नावाची नोंद झाली आहे. नेपाळचा तरूण खेळाडू संदीप लामिचाने याची आयपीएलमध्ये निवड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये सहभागी होणारा संदीप हा पहिला नेपाळी क्रिकेटर ठरला आहे.

१७ वर्षीय संदीपला दिल्ली डेअरडेव्हिल्सने २० लाख रूपयांची बोली लावत खरेदी केले आहे. या लेग स्पिनरने २०१६मध्ये अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये जबरदस्त प्रदर्शन केले होते. संदीपने ६ मॅचेसमध्ये १४ विकेट्स घेतले होते. त्यामुळे सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला होता. अफगाणिस्ताननंतर आता आयपीएलमध्ये नेपाळी खेळाडूही खेळताना दिसणार आहेत. गेल्यावर्षी राशिद खान हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू होता ज्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती.  ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क यानेही संदीपचे प्रदर्शन पाहून कौतुक केले होते. त्याचे प्रदर्शन पाहून क्लार्कने एनएसडब्ल्यूए प्रीमिअर क्रिकेटमध्ये आपल्या वेस्टर्न सबर्बसतर्फे खेळण्यासाठी संदीपची निवड केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)