यंदाच्या आयपीएलमध्ये जयदेव ठरला सर्वात महागडा भारतीय खेळाडू

बंगळुरु : यंदाच्या आयपीएल लिलावात जयदेव उनाडकटने आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय खेळाडू होण्याचा मान  पटकावला आहे. राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात जयदेवला घेण्यात आले असून त्याच्यावर सर्वाधिक 11 कोटी 50 लाख रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

जयदेव उनाडकटसाठी किंग्ज इलेव्हन पंजाबने मोठी बोली लावली होती. मात्र शेवटी या स्पर्धेत उडी घेतलेल्या राजस्थान रॉयल्सने साडे अकरा कोटींमध्ये जयदेवला खरेदी केले. बंगळुरुत आयपीएल लिलाव सुरु आहे. आतापर्यंत बोली लावलेल्या खेळाडूंमध्ये तो सर्वात महागडा खेळाडू, तर सर्वात महागडा दुसरा खेळाडू ठरला आहे.

राजस्थान रॉयल्सनेच बेन स्टोक्सवर सर्वाधिक साडे बारा कोटींची बोली लावली होती. त्यानंतर साडे अकरा कोटींमध्ये जयदेव उनाडकटला खरेदी केले. जयदेव उनाडकट गेल्या वर्षी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत चमकला होता. त्याचा त्याला या आयपीएलमध्येही फायदा झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)