यंदाचे सार्वजनिक उत्सव होणार जोरदार

लोकसभा अन विधानसभेची पेरणी : मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य
सातारा, प्रतिनिधी- लोकसभा अन्‌ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर यंदांचे सार्वजनिक उत्सव धुमधडाक्‍यात साजरे होणार आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर यंदा साजरा होणारा गणेशोत्सव व श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाला विशेष वलय प्राप्त झाले आहे. उत्सवांच्या माध्यमातून उमेदवार प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करणार असल्याने यंदाच हे उत्सव साहजिकच जोरदार साजरा होणार असल्याने मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही आंनदाचे वातावरण आहे.

निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर साजरे होणारे सार्वजनिक उत्सव आजपर्यंत उत्साहात साजरे झाल्याचे दिसून आले आहे. लोकसभा निवडणूक सहा महिन्यांवर तर विधानसभा निवडणूक वर्षभरावर येवून ठेपली आहे. पुढील वर्षी दोन्ही सार्वजनिक उत्सव साजरे होण्यापुर्वी लोकसभेची निवडणूक झालेली असेल तर विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरु झाली असेल . त्यामुळे साहजिकच येत्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या सार्वजनिक उत्सवाला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. निवडणुकांच्या माध्यमातून इच्छूक उमेदवारांकडून निवडणुकीची वातावरण निर्मिती व प्रचाराची पहिली फेरी पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच दोन्ही उत्सव जल्लोषात साजरे करण्याकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा कल राहणार आहे. यंदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी बक्षिसाच्या रक्कमेचा आकडा देखील वाढलेला असेल. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या गणेशमुर्तींची उंची देखील वाढणार आहे. त्याचबरोबर आकर्षक देखाव्यावर देखील कार्यकर्त्यांचा भर असेल. आणि गणपती बप्पाच्या स्वागत व विसर्जन मिरवणुका देखील भव्य , नेत्रदिपक निघतील . साहजिकच उत्सवाचा वाढता भार इच्छूक उमेदवारांच्या खिशावर पडणार आहे. जो उमेदवार मंडळांमध्ये देणग्या देण्यामध्ये अग्रेसर राहिल त्याच उमेदवाराच्या बाजूने मंडळांच्या कार्यकर्त्यांचा कल राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी इच्छूक उमेदवारांचा मंडळाच्या कार्यकर्त्यांना खूश करण्यावर जोर राहील . साहजिकच त्याचा लाभ निवडणुकीत मिळू शकणार असल्याने यंदाचे उत्सव जोरात साजरे होणार आहेत.

साहित्य स्वरूपातही देणगी
मंडळांना लागणारे साहित्य देणगी स्वरूपात देण्या व घेण्यावर जोर राहिलेला असल्याचे दिसून आले आहे. मंडळांना शेडसाठी लागणारे अँगल, पत्रे तसेच साऊंड सिस्टिीमचे वाटप, ढोल-ताशे अथवा व्यायामाचे साहित्य असे देणगीचे स्वरूप राहिलेले आहे. यंदाचे वर्ष निवडणुकीचे असल्याने कार्यकर्त्यांकडून मोठ्या देणगीची मागणी होवू शकते. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आर्थिक जुळणी अत्तापासूनच सुरू केली असल्याचे दिसून येते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)