यंदाचे अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देईल-नरेंद्र मोदी

नवी दिल्ली:  भारताच्या प्रगतीवर जगातील सगळ्यांनीच मोहर उमटवली आहे. यंदाचे अर्थसंकल्प देशाच्या जलदगतीने पुढे जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देईल. अर्थसंकल्पानंतर विविध कमिटी यावर चर्चा करतील. अर्थसंकल्पावर एका चांगल्या संवादाची अपेक्षा आहे. आम्ही सर्व पक्षीय बैठकीतही यामुद्द्यावर चर्चा केली होती, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणानंतर अधिवेशनाची सुरूवात झाली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी नरेंद्र मोदींनी माध्यमांना संबोधित केले.
माध्यमांशी बोलताना नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरही मत मांडले. सर्व राजकीय पक्षांनी तिहेरी तलाकचे विधेयक पास करण्यासाठी मदत करावी, असं अपील मी करणार असल्याचे मोदी म्हणाले. तिहेरी तलाकचे विधेयक पास करून मुस्लीम महिलांना भेट द्यावी, यासंदर्भातील आवाहन बजेट अधिवेशनात करणार असल्याचं मोदींनी म्हंटलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)