यंदाचा विजय दिवस मराठा लाईट इन्फंट्रीला समर्पित

कर्नल संभाजीराव पाटील : मोटरसायकलच्या डेअरडेव्हील्सचे खास आकर्षण

कराड – विजय दिवस समारोहाचे यंदाचे 21 वे वर्ष असून यंदाही दिमाखात विजय दिवस समारोह साजरा केला जाणार आहे. मराठा लाईट इंन्फट्रीला यंदा सुमारे 250 वर्षे होत असल्याने यंदाचा विजय दिवस मराठा लाईट इंन्फट्रीला समर्पित करण्यात आला आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सैन्य दलाच्या कसरतीसह मोटरसायकलच्या डेअरडेव्हील्सचे खास आकर्षण असणार असल्याची माहिती विजय दिवस समितीचे संस्थापक अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांनी दिली.

-Ads-

विजय दिवस समारोह यंदा 14 ते 16 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारी संदर्भातील बैठक प्रांताधिकारी हिंम्मत खराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यादरम्यान ते बोलत होते.
तहसीलदार राजेश चव्हाण, पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी सौ. यु. जे. साळुंखे, नगर अभियंता एम. एच. पाटील, विस्तार अधिकारी आनंद पळसे, बांधकाम विभागाचे एस. व्ही. पवार, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अभिजीत पाटील, तुकाराम वाघमोडे यांच्यासह विजय दिवस समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, यंदाच्या विजय दिवस समारोहात नेहमी प्रमाणेच शोभा यात्रा, कराड स्वच्छता दौड, माजी सैनिकांचा मेळावा, यशवंत जीवन गौरव पुरस्कार वितरण यासह 16 डिसेंबरला छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर मुख्य सैन्य दलाच्या कसरतींचा कार्यक्रम होणार आहे. यंदा सैन्यदलातील जवानांचे डेअरडेव्हील्सचे पथक हे आकर्षण असणार आहे. त्याचबरोबर सैन्यदलाचे श्वान पथक, एसआरपीएफचे पीटीची प्रात्यक्षिक, गुरखा रेजिमेंटचा कुकरी डान्स, बॉम्बे इंजिनीयरींग ग्रुपचे जिम्नॅशीयमचे प्रात्यक्षिक, पुणे येथील पॉवर मोटर ग्रुप, मराठा लाईट इंन्फंट्रीचे लेझीम व मल्लखांबचे पथक आणि स्थानिक विद्यार्थ्यांचे समुह नृत्य सादर केले जाणार आहे. दरम्यान, विविध विभागांच्या खातेप्रमुखांनी आढावा सादर केला. ऍड. संभाजीराव मोहिते, विनायक विभुते यांनीही सूचना मांडल्या.

400 महिलांची मोटरसायकल रॅली

यंदाच्या विजय दिवस समारोहाच्या पार्श्वभूमीवर नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी 16 डिसेंबरला विजय दिवसच्या मुख्य दिवशी 400 महिलांची मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीतील महिला या तिरंगी कपडे परिधान करुन रॅली काढणार असून शहरातून त्या छत्रपती शिवाजी स्टेडीयममध्ये येणार आहेत. त्याचे नियोजन मिनल ढापरे व सहकारी करत असल्याचेही कर्नल पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)