यंदाचा मालाबार युद्धाभ्यास ग्वाममध्ये होणार

नवी दिल्ली : भारत, अमेरिका आणि जपानदरम्यान आयोजित होणारा वार्षिक नौदल युद्धाभ्यास यंदा ग्वाममध्ये होणार आहे. जून 2018 मध्ये होणाऱ्या या युद्धाभ्यासाची तयारी सध्या सुरू असून यंदा ऑस्ट्रेलिया देखील यात सहभागी होऊ शकतो. ग्वाम बेट उत्तर प्रशांत महासागरात स्थित असून यावर अमेरिकेचे नियंत्रण आहे.

मागील वर्षी उत्तर कोरियाने या बेटावर हल्ल्याची धमकी दिली होती. स्वतःच्या सर्वात मोठय़ा सैन्याभ्यासासाठी या बेटाची निवड अमेरिकेने अत्यंत विचारपूर्वक केली आहे. उत्तर कोरियासोबतच चीनला देखील यातून महत्त्वाचा संदेश देण्याची खेळी अमेरिकेने केली आहे. भारत, जपान आणि अमेरिकेने मागील वर्षी हा सागरी युद्धाभ्यास बंगालच्या उपसागरात आयोजित केला होता.

भारत आणि अमेरिकेदरम्यान मालाबार सैन्याभ्यास 1992 पासून आयोजित होत आहे. परंतु दोन्ही देशांनी 2002 पासून या सैन्याभ्यासाला व्यापक स्वरुप दिले. 2016 मध्ये जपान या सैन्याभ्यासाचा स्थायी सदस्य झाला आहे. मागील वर्षी ऑस्ट्रेलियाने देखील यात सहभाग घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱयांदरम्यान 4 देशांची एक स्वतंत्र आघाडी निर्माण करण्याबद्दल अधिकृत चर्चा झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)