यंदाचा मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवाजी पार्कवर होणारा यंदाचा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा यंदा भव्य स्वरुपात साजरा न होता स्थानिक पातळीवरच साजरा करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे परदेशात जाणार असल्याने शिवाजी पार्कवर होणारा गुढीपाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवरच गुढीपाडवा मेळावा साजरा करावा असे पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. गुढीपाडव्याला राजकीय पक्ष शोभायात्रा काढतात. यामध्ये शिवसेना आणि मनसे आघाडीवर असतात. दोन वर्षांपूर्वी मनसेने गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात केली होती. परंतु राज ठाकरे वैयक्तिक कारणांमुळे परदेशात जाणार असल्याने यंदा हा मेळावा रद्द करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)