ह्युस्टन – दरवर्षी जयपुर मध्ये होणारे साहित्य संमेलन हे यंदा अमेरिकेत होणार आहे. अमेरिकेतील ह्युस्टन आणि टेक्‍सास शहराची त्यासाठी निवड करण्यात आली असून येत्या 14 आणि 15 सप्टेंबरला दोन दिवस हा फेस्टीव्हल तेथे होईल. भारतातील खासदार शशी थरूर आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत नवतेज सरना हे या फेस्टीव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ह्युस्टन नंतर 19 आणि 20 ला न्युयॉर्क मध्ये आणि 21 ते 23 सप्टेंबर मध्ये कोलोराडो येथे ही साहित्य जत्रा भरणार आहे.

ह्युस्टन येथील संयोजनाचे काम अशिया सोसायटीच्या टेक्‍सास सेंटर तर्फे केले जाणार आहे. वैश्‍विक स्तरावर लेखक आणि साहित्यीकांमध्ये समन्वय राहावा त्यांच्यात संवाद व्हावा या उद्देशाने आम्ही याचे आयोजन केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ह्युस्टन हे विचारवंत आणि लेखकांचे शहर आहे. त्यामुळे जयपुर फेस्टीव्हलचा प्रारंभ अमेरिकेत या शहरातून होईल.

आशिया सोसायटीला या संमेलनाचे संयोजन पद स्वीकारण्यात विशेष आनंद होत आहे असे या सोसायटीचे पदाधिकारी रिच लेव्ही यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)