यंदाचा गाळप हंगाम लवकर संपविण्याचे कारखान्यांचे प्रयत्न

File Photo

पुणे – यंदाच्या गळीत हंगामात आतापर्यंत 334.03 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून तब्बल 346.08 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

ऑक्‍टोबरपासून राज्यात गळीत हंगाम सुरू झाला आहे, पण कारखाने सुरू झाले नव्हते. आता मात्र राज्यातील बहुतांशी कारखाने सुरू झाले आहेत. सध्या राज्यात 183 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यात सहकारी 99 व खासगी 84 कारखान्यांचा समावेश आहे. सध्या राज्यात पुणे विभागात सर्वांत जास्त म्हणजे 62 कारखाने सुरू आहेत. त्यात खासगी आणि सहकारी असे प्रत्येकी 31 कारखाने सुरू आहेत. त्यानंतर कोल्हापूर विभागात तब्बल 36 कारखाने सुरू आहेत. त्यात सहकारी 25 कारखान्यांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात सध्या सर्वत्र गाळप हंगाम सुरू असून जानेवारीपासून पडणाऱ्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर कारखान्यांनी गाळप हंगाम लवकर संपावा, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी सुद्धा पाण्याची उपलब्ध आहेत, तोपर्यंतच ऊस वाढवून तो तोडून कारखान्याकडे पाठविण्यास सुरूवात केली आहे. हा हंगाम साधरणत: जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)