यंदाचा गळीत हंगाम रखडण्याची चिन्हे

File Photo

“एफआरपी’बाबत अजूनही संभ्रमावस्था

पुणे – “एफआरपी’ अर्थात उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीबाबत असणारी संभ्रमावस्था आणि शेतकरी संघटनांनी विविध ठिकाणी सुरू केलेले आंदोलन, याबाबत सरकारकडून होत असणारा वेळाकाढूपणा यामुळे यंदाचा गळीत हंगाम रखडणार, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेचे दर 600 रुपयांनी कमी आहेत तसेच मागील वर्षीची थकबाकी अजूनही वसूल झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या गळीत हंगामात “एफआरपी’अधिक 200 रुपये पहिली उचल देण्याचा आदेश शासनाने कारखान्यांना दिला आहे. साखर कारखान्यांना हे सध्याच्या परिस्थितीत शक्‍य नाही. त्यामुळे कारखान्यांनी गळीत हगाम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.त्याचबरोबर दुसरीकडे शेतकरी संघटनासुद्धा आक्रमक झाल्या आहेत. त्या शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यापर्यंत जावू देत नाहीत. अनेक ठिकाणी वाटेतच गाड्या अडविल्या जातात. काही वेळा ट्रॅक्‍टरच्या टायरमधील हवा सोडण्यात येते. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. आगामी काळात पाणी टंचाई तीव्र होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर शेतकरी ऊस लवकरच कारखान्यांकडे नेत आहेत. पण, काही संघटनांच्या दबावामुळे अडचण निर्माण होत आहे. या सर्व प्रकारांमुळे यंदाचा गळीत हंगाम रखडणार, अशीच चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)