यंदाचा गणेशोत्सव होणार पर्यावरणपूरक

गायत्री वाजपेयी

पुणे- गणेशोत्सवात सजावट आणि इतर कामासाठी प्लॅस्टिक, थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. मात्र राज्यभरात नुकत्याच लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीमुळे गणपतीमंडळांवर याचा परिणाम होईल, असे वाटत असतानाच, मंडळांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

पर्यावरण आणि नागरिकांच्या हिताचा निर्णय असल्याचे सांगत, प्लॅस्टिकसाठी पर्यावरणपूरक पर्यायाचा शोध घेणार असल्याची ग्वाही मंडळप्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव हा खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक उत्सव असेल, अशी अपेक्षा निर्माण झाली आहे.
राज्याच्या पर्यावरण विभागाने प्लॅस्टिकपासून बनविल्या जाणाऱ्या पिशव्या तसेच प्लॅस्टिक आणि थर्माकॉल वस्तूंचे उत्पादन, वापर, साठवणूक तसेच वितरण-विक्री करण्यावर निर्बंध घालणारे आदेश 2 जानेवारी 2018 ला काढले होते. त्या अनुषंगाने विविध क्षेत्रातील व्यावसायिक आणि नागरिकांक़डून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या या निर्णयाला शहरातील गणपती मंडळांनी संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

आतापर्यंत मंडळांकडून “युझ ऍन्ड थ्रो’ स्वरूपातील वस्तू, विशेषत: ग्लास, पत्रावळी अशा प्लॅस्टिकचा वस्तूंचा वापर होत असे. अनेकवेळा गणपतीचा सेटही थर्माकोलपासून बनविला जात असे. कमी किमतीत आणि आकर्षक स्वरूपात मिळत असल्यामुळे मंडळांकडून साहजिकच या वस्तूंना मागणी असत. मात्र अशा वस्तूंचा वापरामुळे होणारे नुकसान पाहता येणाऱ्या काळात यांचे पर्यावरणपूरक पर्याय निश्‍चितपणे शोधले जातील.
– जयेश कासट, निरंजन सेवाभावी ट्रस्ट.


आमच्या मंडळाकडून गेली काही वर्षे सातत्याने याबाबत जनजागृती केली जात आहे. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून मंडळाकडून प्लॅस्टिकच्या वस्तूंचा वापर बंद करण्यात आला होता. या निर्णयामुळे नागरिकांना आणि पर्यावरणाला मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी या निर्णायाला पाठिंबा द्यावा.
– नितीन झरांडे, अध्यक्ष, चिमण्या मारुती गणपती मंडळ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)