‘यंटम’ २ फेब्रुवारीला होणार प्रदर्शित…

 

-Ads-

दिग्दर्शक रवी जाधव यांनी यापूर्वी अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रेगे’ आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘कॉफी आणि बरंच काही’ हे दोन चित्रपट प्रस्तुत केले होते. अतिशय वेगळ्या धाटणीचे हे चित्रपट प्रेक्षकांच्याही पसंतीला उतरले. आता ‘यंटम’ असे आगळेवेगळे नाव असलेला मराठी चित्रपट प्रस्तुत करीत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी ‘यंटम’चे दिग्दर्शन केले आहे. ”यंटम’ हा सिनेमा येत्या २ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

‘यंटम’ हा बोलीभाषेतला शब्द आहे. ग्रामीण भागात हा शब्द प्रचलित आहे. ही एक म्युझिकल फिल्म आहे. ‘यंटम’ च्या रूपाने मनातली एक गोष्ट आज मोठ्या पडद्यावर साकारायला सज्ज झाली असून यासाठी निर्माते अमोल ज्ञानेश्वर काळे यांनी जे सहकार्य केले त्यासाठी मी त्यांचा आभारी असून हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल याचा विश्वास वाटतो, असे समीर पाटील यांनी सांगितले.

What is your reaction?
42 :thumbsup:
26 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)