म.फु.कृषी विद्यापीठाने डाळिंब शेतीचा पाया घातला

आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन
डाळिंब उत्पादकांची कार्यशाळा
कृषी विभागाचा उपक्रम

संगमनेर – राज्यात डाळिंब शेतीचा पाया हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने घातला. डाळिंबाचे झाड कुठेतरी बांधावर दिसायचे, त्याचे फळ पुजेतच पहायला मिळायचे. परंतु याच पिकाने शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे काम केले. आपण या शेतीमध्ये सुज्ञ झालो असलो तरी बदलते तंत्रज्ञान समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन माजी कृषीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
राज्य सरकारचा कृषी विभाग व संगमनेर तालुका ऍग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केटिंग को-ऑप. सोसायटी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने डाळिंब उत्पादकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थोरात बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील विस्तार व कृषी संचालक डॉ. किरण कोकाटे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन कॅम्पच्या रोगशास्त्र विभागाच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्योत्स्ना शर्मा, पुणे कृषी महाविद्यालयातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. विनय सुपे, शेतकी संघाचे शंकर खेमनर, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत रहाटळ, ऍड. सुहास आहेर, सतिश कानवडे, केशवराव मुर्तडक यावेळी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, कोणत्याही विषयात माणूस हा कधीच परिपूर्ण नसतो. त्यामुळे अशा कार्यशाळांमधून शास्त्रज्ञ व तज्ञ मार्गदर्शकांकडून नवीन नवीन ज्ञान-तंत्रज्ञान समजावून घ्यायला पाहिजे. शेतीच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांची फार मोठे काम आहे. शेतकऱ्यांमध्ये जिज्ञासू वृत्ती हवी, ती त्यांनी अधिकाधिक जोपासली पाहिजे. केंद्रात शरदराव पवार हे कृषिमंत्री होते. त्यांनी या शेतीत महत्त्वाची भूमिका बजावली. कृषी विभागाने पुढील वर्षाचे डाळिंब धोरण तयार करून ते राबविले पाहिजे, असे थोरात यांनी सांगितले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, दुष्काळी भागाला वरदान ठरणारे कमी पाण्याचे डाळिंब पीक आहे. डाळिंबाने शेतकऱ्यांच्या जीवनात फार मोठी आर्थिक क्रांती केली आहे. देशाच्या सिमेवर प्राणपणाने लढणारा सैनिक व निसर्गाच्या प्रतिकुल परिस्थितीत समर्थपणे झुंज देणारा शेतकरी यात काहीच फरक नाही. शेतकऱ्यांनी कष्टातून उभ्या केलेल्या आपल्या डाळिंब शेतीचा फायदा हा देशातल्या गुजरात, राजस्थान व अन्य अनेक राज्यांनी घेतलेल्या आहे. आता डाळिंब हे प्रमुख पिक होवू पाहत आहे.

मररोग, तेल्या या रोगांची डाळिंब शेतीला घेरलेले आहे. ही निसर्गाचा प्रतिकुल समाधानकारक भाव मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. या आव्हानांना शेतकऱ्यांनी समर्थपणे सामोरे जावे असे आवाहन तांबे यांनी केले.
मानसांना जसे डेंग्यु, स्वाईन फ्यु सारखे आजार होतात तसे शेतातील पिकांनाही होतात. डाळिबांची प्रतिकार शक्ती वाढवायला हवी. एकरी उत्पादन वाढविण्यासाठी त्याचे तंत्र समजून घ्यायला हवे. दर्जेदार डाळिंब पिकफन श्रीमंत माणसांच्या खिशातून पैसे काढायला हवेत. चांगल्या दर्जाचे डाळिंब त्यांना दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या छोट्या-छोट्या कंपन्या तयार करून त्यांना गटशेतीचा महत्त्व सांगायला हवे.
उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे म्हणाले, डाळिंबाची शेती सेंद्रिय पद्धतीने करून, शेण, गोमुत्रच्या सहाय्याने स्लरी तयार करून, खतांचा व औषधांचा खर्च शेतकऱ्यांनी कमी केला पाहिजे. औषधांचा वापर हा खर्च कमी करण्याचाच भाग आहे. या मार्गाने शेतकरी गेल्यास निर्यातक्षम डाळिंब तयार होईल. सूत्रसंचलन नामदेव कहांडळ, तालुका कृषीअधिकारी यांनी केले. आभार कृषी अधिकारी फिरोदिया यांनी मानले.

शेततळे व डाळिंबांचा तालुका

आपण कृषीमंत्री असताना संगमनेर तालुक्‍यात सर्वात जास्त शेततळे तयार केले. अनेक शेतकऱ्यांनी याच शेततळ्यावर ठिबक सिंचनच्या माध्यमातून डाळिंब शेती केली. आज तालुक्‍यात सर्वत्र डाळिंब शेती दिसते. या पाठीमागे शेतकरी कुटुंबाचे कष्ट आहेत.
आमदार बाळासाहेब थोरात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)