म. फुले शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान राज्याला मार्गदर्शक

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे प्रतिपादन

पुसेगाव – म. फुले शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या माध्यमातून म. फुले यांचा शिक्षणविषयक विचार पुढे नेला जातोय, ही अभिमानाची बाब आहे. खटाव पंचायत समिती व शिक्षण विभागाच्या संकल्पनेतून साकारला जाणारा हा अभिनव पॅटर्न राज्याला मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

कटगुण, ता. खटाव येथे म. फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, शिक्षण सभापती राजेश पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगोड, सभापती वनिता गोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जि. प. वित्त अधिकारी धर्मेंद्र काळोखे, जि. प. सदस्य प्रदीप विधाते, सभापती कल्पना मोरे, उपसभापती संतोष साळुंखे, नंदकुमार मोरे, जि. प. सदस्या सुनिता कचरे, पं. स. सदस्य आनंदराव भोंडवे, रेखा घार्गे, जयश्री कदम, निलादेवी जाधव, गटविकास अधिकारी रमेश काळे, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, उदय कदम, विजयकुमार कोकरे यांच्यासह अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. संजीवराजे म्हणाले, या अभियानातून जि. प. शाळांमधून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना तालुकाचे व्यासपीठ मिळेल. आधुनिक ज्ञानाचा प्रकाश घेऊन बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी स्पर्धेच्या युगात कुठेही कमी पडणार नाही. पं. स. व शिक्षण विभागाने राबविलेले हे अभियान जिल्हाभर राबविण्याचा मानस आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)